Home गुन्हेवार्ता मोहफुलाची हातभट्टी दारु तयार करणा-या ठिकाणावर छापा ;१,६०,२००चा मुद्देमाल जप्त

मोहफुलाची हातभट्टी दारु तयार करणा-या ठिकाणावर छापा ;१,६०,२००चा मुद्देमाल जप्त

0

गोंदिया,दि.27ः गंगाझरी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या फत्तेपूर ता.गोंदिया या गावच्या नाल्याजवळ असलेल्या शेतशिवरात अवैधरित्या मोहफुलाची हातभटटी दारु तयार करीत असल्याच्या माहितीच्या आधारे छापा घालून सुमारे 1 लाख 60 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलीस हवालदार मनोहर अंबुळे यांना मिळ्यालेल्या माहितीच्या आधारे ठाणेदार पोपट टिळेकर यांनी पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनात ही कारवाई 26 जानेवारीला केली.या कारवाई दरम्यान शेतशिवारातून दोन जर्मन करच्या , सडवा रसायन मोहफुल, हातभट्टी दारु व दारु गाळण्याचे इतर साहीत्य असा एकुण मुद्येमाल किमती १,६०,२००/- रु चा माल हस्तगत केले. नंदकिशोर सुरजलाल कटरे वय 35 वर्षे रा. फत्तेपूर ता. जि.गोंदिया यांचेवर पोलीस स्टेशन गंगाझरी येथे अप.क्र. ३४/ २०२३ कलम ६५ (ब)(क)(ड)(ई)(फ) महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कामगिरी वरीष्ठांचे निर्देश व आदेशान्वये ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर यांचे मार्गदर्शनात पो.ह वा मनोहर अंबुले ब नं ८५०, सुशील गजभिये ब न १५३७, पो ना. हरीश कटरे ब न १७४०, पो शी हरिकिशन भेलावे ब न १९०८ चापो.शि. जितेंदसिंह बघेल ब. न. १८२५ यांनी सदर ची कार्यवाही केली आहे.

Berar Times
Exit mobile version