देशी दारूची चोरटी वाहतूक;6.36 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
15

: विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील कुºहाडी येथील आयटीआय चौकात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सापळा रचून 25 जानेवारी रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास एका चारचाकी वाहनातून अवैधरित्या दारूची वाहतून करणाºयाला पकडले. यावेळी देशी दारूचे 40 बॉक्स व एक चारचाकी वाहन असा एकूण 6 लाख 36 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान आरोपी रजत राजू साखरे (वय 26, रा. तुमसर, ता. गोरेगाव) याला अटक करण्यात आली.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन व अवैध धंद्यांवर आळा घालण्याकरिता पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पिशेष पथकास आदेशित केले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध धंद्यांविरूद्ध विशेष धडक मोहीम सुरू आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे 25 जानेवारी रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील कुºहाडी येथील आयटीआय चौकात एका पांढºया रंगाच्या मारूती सुझुकी (एमएच 35/ एआर 4913) गाडीला थांबविण्यात आले. त्यात देशी दारूचे 40 बॉक्स आढळून आले. पोलिसांनी देशी दारूचे 40 बॉक्स व एक चारचाकी वाहन असा एकूण 6 लाख 36 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात आरोपी रजत राजू साखरे (वय 26, रा. तुमसर, ता. गोरेगाव), दिनेश ढोमणे रा. कुºहाडी, ता. गोरेगाव व चिल्लर देशी दारू दुकानच्या चालक-मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या नेतृत्वातील विशेष पोलीस पथकातील पोलीस हवालदार सुजित हलमारे, पोलीस हवालदार महेश मेहर, पोलीस नायक शैलेष कुमार निनावे, दयाराम घरत, चालक पोलीस शिपाई हरिकृष्णा राव यांनी केली.