38.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता गोंदियात तीन नराधमांचा अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार

गोंदियात तीन नराधमांचा अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार

0
41

blank

गोंदिया- शहरातील एका 16 वर्षाच्या मुलीवर गोंदिया तसेच नागपूर येथे सतत तीन दिवस सामुहिक बलात्कार करणार्‍या तीन नराधमांवर गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी फरार आहे. प्रशांत मुलचंद मोटघरे (27) रा. सिंगलटोली आंबेडकर वॉर्ड गोंदिया व सौरभ ईश्वर मेश्राम (23) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.ही कारवाई 28 जानेवारी रोजी करण्यात आली.शहरातील एका अल्पवयीन मुलीला येथील मामा चौकातून 24 जानेवारी रोजी उचलून तिला बांधतलाव येथे नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. दोन तासानंतर पुन्हा तिला मामा चौकात सोडण्यात आले.यानंतर दुसर्‍याने लगेच तिला एमआयडीसी मुंडीपार परिसरात नेऊन अत्याचार केला. रात्री 9 वाजताच्या सुमारास तिला मामा चौकात सोडल्यावर तिला नागपूर येथील एका व्यक्तीच्या स्वाधीन करण्यात आले.त्याने नागपूर येथे नेऊन तिच्यावर 24 ते 27 जानेवारी या काळात अत्याचर केला. 27 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास तिला गोंदियात सोडले.यानंतर पीडित व कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिन्ही नराधमांवर भादंविच्या कलम 363, 376, 376 (2), (एन), 354 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी प्रशांत मोटघरे व सौरभ मेश्राम यांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. दोन्ही
आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 10 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

blank