टिप्परच्या धडकेत चिमुकला ठार,मुंडीपार (खुर्द )येथील घटना

0
42

गोंदिया-(ता.31)-घरासमोरील अंगणात खेळत असताना बांधकामात साहित्य घेऊन जाणाऱ्या टिप्पर ने धडक दिल्याने एक चिमुकला जाग्गीच ठार झाल्याची दुदैवी घटना मंगळवारी(ता.31)संध्याकाळी चारच्या सुमारास गोंदिया तालुकात्यातील मुंडीपार (खुर्द) येथील घडली असून नक्ष (तनुज) छनिलाल गौतम वय सहा वर्षे असे मृतक मुलाचे नाव आहे.
तनुज आपल्या घरासमोर खेळत असताना मुंडीपार – कामठा मार्गावरील रस्ता बांधकामाचे साहित्य घेऊन जाणाऱ्या टिप्पर (MH35-K5080) चालकाने निष्काळजीपणाने टिप्पर चालवून चिमुकल्या लहान मुलाला धडक दिली. यात चिमुकल्या मुलाचे घटनास्थळीच मृत्यू झाले. सदर घटनेची गोंदिया ग्रामीण पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय भुसारी हे करीत आहेत.