गोरेगावचा कृषी पर्यवेक्षक ठाकरे लाच घेतांना गजाआड

0
74

गोंदिया,दि.04- गोरेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक दिंगबर ठाकरे (रा.आंबाटोली, फुलचूर,गोंदिया)  यास दोन हजार रुपयाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ आज (दि.4)पकडले.तक्रारदार हे शेतकरी असून वडिलोपार्जित 9 एकर असून एक एकर शेतजमीन ही मोठ्या बहिणीला देण्यात आली असून तक्रारदार हेच ती शेती सद्या करीत आहेत.बहिणीच्या नावे 7/12 असलेल्या शेतजमीनीवर कृषी विभागाच्यावतीने शासकीय योजनेंतर्गंत भात मळणी मशीन मंजूर झाली असून खरेदी प्रकिया पुर्ण करण्यात आली आहे.परंतु मशीनची मौका तपासणी करुन कुठलीही त्रुटी न काढता अहवाल पाठविण्यासाठी 2 हजार रुपयाची मागणी केली.मात्र तक्रारदाराला लाच द्यायची मुळीच इच्छा नसल्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली.त्यानुसार सापळा रचून पडताळणी केल्यानंतर लाचेची रक्कम तक्रारदार यांच्या देऊटोला येथील शेतात स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.ही कारवाई पोलीस उपअधिक्षक पुरुषोत्तम अहेरकर,पोलीस निरिक्षक अतुल तवाडे,फौजदार विजय खोब्रागडे,राजकुमार बोहरे,मंगेश कहालकर,संतोष शेंडे,संतोष बोपचे,अशोक कापसे,संगिता पटले,दिपक बाटबर्वे यांच्या पथाकने केली.