गडचिरोलीच्या बोधीनटोला जंगलात पोलीस नक्षल्यांत चकमक,साहित्य जप्त

0
22

गडचिरोली,दि.10ः- जिल्हा पोलीस विभागातंर्गत येत असलेल्या उपविभाग पेंढरी अंतर्गत येणा­या पोमकें गोडलवाही हद्दीतील छत्तीसगड-महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगतच्या बोधीनटोला गावाजवळील जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास अभियान राबवित असताना घडली.पोलीस विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या नेतृत्वात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवितांना सदर जंगल परिसरात 20 ते 25 अशा मोठ्या संख्येतील नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांच्या दिशेने ठार मारण्याच्या उद्देशाने जोरदार गोळीबार केला.यावर विशेष अभियान पथकांच्या बहादूर जवानांनी प्रतिउत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला असता, जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. चकमकीदरम्यान सदर जंगल परिसरात, काही नक्षल्यांनी घटनास्थळावर सोडून गेलेले पिठ्ठु व मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले.सदर जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान आणखी सुरु असुन, शोध मोहीम सुरु आहे.