Home गुन्हेवार्ता रविकांत तुपकरांना अटक; २५ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल

रविकांत तुपकरांना अटक; २५ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल

0

बुलढाणा,दि.12ः सोयाबीन- कापूस उत्पादकांच्या विविध मागण्याकडे केंद्र व राज्य शासन करीत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ तुपकर यांनी काल, शनिवारी दुपारी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यानंतर तीन तास जिल्हा कचेरीसमोर ठिय्या आंदोलन केले. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करीत व लाठीमार करीत आंदोलन उधळून लावले. तुपकरांसह प्रमुख पदाधिकारी व शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन बुलढाणा पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

मध्यरात्री तुपकर यांच्यासह २५ जणांविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे आदी गंभीर कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. यानंतर त्यांना अटक करून आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास त्यांना चिखली पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

त्याअगोदर काल रात्री उशिरापर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अमानुष लाठीमारच्या निषेधार्थ तुपकरांनी पोलीस ठाण्यात अन्नत्याग आंदोलन सुरू केले. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यासमोर कडक बंदोबस्त लावण्यात आला. नेतेच काय पत्रकारांनाही वार्तांकन करण्यासाठी ठाण्यात जाऊ देण्यात आले नाही. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे व माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोन्द्रे यांना ठाण्यात जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे बोन्द्रे यांनी काही काळ ठाण्यासमोर ठिय्या धरला. नंतर त्यांनी तुपकरांची भेट घेतली. यापाठोपाठ पत्रकारांनीही ठिय्या धरला.

Exit mobile version