ट्रक्टरवरून पडून दवनीवाडा येथे महिलेचा मृत्यू

0
29

गोंदिया– दवनीवाडा पोलीस स्टेशन अतंर्गत दवनीवाडा पासून सुरु असलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या -दवनीवाडा कारुटोला रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. कामावर ट्रक्टरवर मजूराना नेत असताना महिला मजुर पुष्पा रमेश बागडे वय 40 हिचा पडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.त्यानंतर घटनास्थळावर तणावाची परिस्थिती निर्माण होताच पोलिसांनी कंत्राटदारासोबत चर्चा करुन मृतकाच्या परिवारास  मदत देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर मृतदेह उचलण्यात आले.