अवैधरित्या खैर जातीचे पाच लाखाचे लाकुड नेतांना जप्त

0
23

गोंदिया,दि.28ः दवनीवाडा पोलीस ठाणेअंतर्गत रात्रीदरम्यानच्या गस्तीवर असतांना खैर जातीचे लाकुड तस्करी करणाऱ्यास वाहनासह अटक करुन अंदाजे ५ लाखाचे खैर जातीचे लाकुड व वाहन जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 28 फेब्रुवारी रोजी केली.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, यांचे आदेशा नुसार पो.नि. दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि.२७+२८ /०२/२०२३ रोजी पोलीस ठाणे दवनीवाडा, तिरोडा परीसरात रात्र दरम्यान अवैध धंदे रेड गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असतांना खैरलांजी म.प्र. कडुन तिरोडा मार्गे नागपुरकडे एका पिकअप वाहनात खैर जातीचे लाकुड तस्करी करून विक्री करीता जात असताना परसवाडा येथे दि.२८/०२/२०२३ चे रात्री  सापळा रचून नाकाबंदी करुन पांढऱ्या रंगाचे टाटा कंपनीचे पिकअप वाहन क्र.एमएच.३०.एल ४८८५ वाहन पकडण्यात आले.वाहनाची तपासणीत डाल्यात खैर जातीचे लाकूड अंदाजे ३ ते ४ फुट लांबीचे ५० ते ६० सें.मी. व्यास असलेले अंदाजे १५० नग दिसून आले. सदर लाकुड, लाकडाचे मालकी हक्क बाबत व परवाना बाबत गाडीचे चालक विधीसंघर्ष बालक व सोबत असलेला रतनलाल सुरजलाल पटले यांना विचारपुस केली असता कोणतेही कागदपत्र नसल्याने व सदरचे लाकुड हे अवैधरित्या विक्री करीता सिहोरा येथे नेत असल्याचे सांगितल्याने जप्त करुन वनपरीक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक कार्यालय, वनविभाग तिरोडा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई वरीष्ठाचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि विघ्ने, पो.अंमलदार पो. हवा. ठाकरे, तुरकर, पटले यांनी केली .