लिनेस क्लबचा पदग्रहण सोहळा

0
37

चिचगड,दि.२८ः-लिनेस क्लब चिचगडचा पदग्रहण सोहळा इंस्टॉलिंग ऑफिसर पास्ट मल्टिपल प्रेसिडेंट लिनेस शोभनाजी वांदीले, चिप गेस्ट व्हॉईस मल्टीपल प्रेसिडेंट लिनेस कुमकुमजी वर्मा क्लब स्पॉन्सर शिला मारगाये यांचा उपस्थितीत पार पडला.शपथविधी अधिकारी शोभणाजी वांदिले यांनी प्रेसिडेंट अर्चना नरवरे, सेक्रेटरी लीना जनबंधू ,कोषाध्यक्ष प्रगती कोल्हारे यांना शपथ दिली.या कार्यक्रमाला देवरी क्लब प्रेसिडेंट शिल्पा बांते सेक्रेटरी कमलेश्वरी गौतम कॅबिनेट ममता रोकडे उपस्थित होत्या.या कार्यक्रमामध्ये पत्रकार सुरेश गिरेपुंजे आणि सुभाष सोनवणे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.संचालन ममता रोकडे यांनी केले तर आभार शीला मारगाये यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व लिनेस क्लबच्या अर्चना भवनलाल नरवरे , रीना विकास जनबंधू ,प्रगती युवराज कोल्हारे, निशा दिलीप परिहार ,कविता जितू शाहू ,नीतू जनार्दन कोल्हारे ,माया गणेश लुटे,गीता नंदकिशोर भोयर,पुनम राजेंद्र कोल्हे,रेखा भारत सोनटक्के, चंद्रकला रमेश कोलारे,कविता वामन देशमुख, स्मिता चंद्रपाल राऊत,किरण देवेंद्र कच्छप, पुष्पा कृष्णा देहारी, माधुरी पंकज डोंगरे, या सदस्यांनी सहकार्य केले.