ठाणेदाराने केला पीडीत मुलीवर अत्याचार,तक्रारीनंतर ठाणेदाराची हकालपट्टी

0
468

वर्धा,दि.09ः जिल्ह्यातील हिंगणघाट पोलीस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरून ठाणेदार संपत चव्हाण यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.पीडित मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार हा धक्कादायक असून तेवढाच संतापजनक आहे. 24 वर्षीय पीडित ही आपल्या कुटुंबाविरुद्ध 5 ऑगस्ट 2021 पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता. त्यावेळी ठाणेदार संपत चव्हाण हे कर्तव्यावर होते.त्यावेळी तू माझ्याशी मैत्री करशील तरच ‘मी तुझी तक्रार घेईल’ असे पिडीतेला म्हटले.त्यानंतर ठाणेदार संपत चव्हाण हे पीडितेच्या घरी जाऊन शारीरिक संबंध ठेवले तरच तक्रार घेईल.पीडित युवती घरी एकटीच असल्याचे पाहून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.या दरम्यान त्यांनी एक व्हिडिओ काढून व्हिडिओच्या आधारे पीडितेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करून तिच्यावर वारंवार अत्याचार करायचा. पीडितेने ठाणेदार यांच्या पत्नीला माहिती देण्यात आल्यावर पत्नीने युवतीला फसवण्याची धमकी दिल्याचे तक्रारारीत म्हटले आहे. पीडित मुलीने जवळपास पाच पानामध्ये आपला बयान नोंदविल्याचे तक्रारीमध्ये दिसत आहे. 6 मार्च रोजी हिंगणघाट पोलीस ठाण्यात ठाणेदार संपत चव्हाण यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या कलामांनी 376 (2)अ, 376 (1),376 (2)(n) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान हिंगणघाट पोलीस ठाण्याचे ठाणेदार फुंडकर यांनी सदर कारवाईची प्रकिया सुरु आहे असे सांगितले. मात्र पोलीस स्टेशन मधील ‘एफआयआर’ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून ठाणेदार संपत चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचा FIR समोर आलेला आहे.

तक्रारीनंतर ठाणेदारांची तडकाफडकी बदली?

21 डिसेंबरला पीडितेने ठाणेदार चव्हाण यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली असता पोलिसविरुद्ध तक्रार असल्याने ही तक्रार पोलीस अधीक्षकाकडे पाठविण्यात येईल असे पीडितेला सांगण्यात आले.त्यानंतर ठाणेदार यांची बदली करून त्यांच्या जागेवर प्रभारी ठाणेदार कैलास फुंडकर यांना पदभार देण्यात आला.ठाणेदार संपत चव्हाण यांची वर्धा येथे तात्पुरती बदली करण्यात आल्याचे समजते.