मॉडेल कॉन्वेंट एण्ड सायन्स कॉलेज गोरेगांव मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात

0
26

गोरेगांव :– स्थानीय मॉडेल कॉन्वेंट एण्ड सायन्स कॉलेज गोरेगांव मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रम अध्यक्षस्थानी सौ सुरेखाताई आर. कटरे संचालक श्री तुलसी शिक्षणसंस्था गोरेगांव तसेच दीपप्रज्वलक म्हणुन शाळेच्या प्राचार्य सौ सी. पी. मेश्राम उपस्थित होत्या.प्रमुख अतिथी म्हणुन पर्यवेक्षक कु एस. डी. चीचामे, स. शि. आर. बी.पटले हे होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून क्रांतीज्योति सावित्रीबाई फूले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रास्ताविक पर्यवेक्षक कु.एस.डी.चीचामे यांनी केले.त्याच्याबरोबर स. शि.सचिन बघेले यांच्या द्वारे आई महत्व पटवून देणारे गीत सादर केले गेले. त्याचबरोबर शाळेतील महिला शिक्षिका यांच्याद्वारे गीत आणि सुंदर नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन स. शि.आर.बी. कोल्हे यांनी केले तर आभार बादल कटरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.