डुप्लीकेट फेविक्विक व पिडीलाईट विकणारे गोंदियातील 3 व्यापारी पोलिसांच्या जाळ्यात

0
56

गोंदिया,दि.15ः गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारावर शहरात बनावटी (ड्युप्लीकेट) साहित्य,वस्तू , फेवी क्विकचा व्यवसाय करणाऱ्या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करुन ८८९० रूपयाचा बनावटी फेवी क्विक जप्त करण्यात आले आहे.यांसदर्भात फिर्यादी मो.तौकीर मो.कालेखान चौधरी (वय २८,रा.जे.जे.कॉलोनी वजीरपुर अशोक विहार,उत्तरप्रदेश दिल्ली)व्यवसाय-टिम लिडर,सेमिता लिगल अडव्होकेट एन्ड सॉलिसिटर यानी कंपनी तर्फे न्यायीक काम पाहण्याकरीता प्राधिकृत केल्याचे कळवून तक्रार नोंदवली होती.तसेच आधारे सेमिता लिगल फर्म, नोयडा, दिल्ली पिडीलाईट कंपनीशी टायप असुन पिडी लाईट कंपनीच्या माध्यमाने सर्व लिगल वस्तू या फर्मतर्फे पाहीले जातात.पिडीलाईट कंपनीच्या नावाने काही दिवसांपासून गोंदिया येथे बनावटी (ड्युप्लीकेट) वस्तू , साहित्य, वस्तू तयार करून विक्री केली जात असल्याबाबत व बोगस फेविक्वीकच्या विक्रीमुळे कंपनीचे नुकसान होत असल्याचे सांगितले होते.या अनुषंगाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी सदर प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेवून कायदेशीर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले होते.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांनी पथकासह सदर बाबीची संपूर्ण शहानिशा करून गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशिर माहीतीच्या आधारे 14 मार्चच्या सायंकाळी बजाज ट्रेडर्सचे मालक श्याम मोहनलाल बजाज,दिपक बच्चुमल लिलवानी व विवेक हरिशंकर गुप्ता यांना बनावटी (डूप्लीकेट) फेविक्वीक विक्री करताना तसेच दुकानात बाळगताना रंगेहाथ पकडून ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेल्या क्र.१ ते २ यांचे बजाज ट्रेडर्स दुकानातून ४७९ नग फेवि क्वीक किंमती २३९५/- व क्र.३ यांचे घरून किंमती ६४९५ /-रुपये असा एकूण ८८९०/- रूपयाचा पिडीला ईट कंपनीचे नावाचे बनावटी (डयुप्लीकेट) फेविक्विक टयुब माल जप्त करण्यात आले आहे.तपासादरम्यान प्रकाश खत्री रा. बिलासपुर (छ.ग.) हा ईसम गोंदिया येथे आपल्यासह इतरांना सुध्दा बनावटी (डयूप्लीकेट) माल पुरवित असल्याची माहिती तिघांनी दिल्याने यांचेविरूद्ध कॉपी राईट अॅक्टचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम ५१, ६३, ६५ प्रतिलिपी अधिकार अधिनियम १९५७ अन्वये कारवाई करुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.