सुंगधित तंबाखू पकडला, मुद्देमालासह आरोपीला अटक

0
18

सिंदिवाही-पोलिस स्टेशन नागभिड यांनी शहरातील टी-पॉइंटजवळ गुप्त माहितीच्या आधारे सीलबंद डब्यासहित अंदाजे एकूण १ लाख ३२ हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू, ६ लाखांची फोरव्हिलर गाडी, ३0 हजार रुपये किमतीचे ४ मोबाईल जप्त करण्यात आले. यामध्ये ५ आरोपींना अटक करण्यात आले.
गाडी नंबर एम एच ३४ सी.पी. २६२४ असून ती भंडारावरून चंद्रपूरकडे जात असतांना गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी करुण पकडण्यात आले. ही कारवाई ठाणेदार योगेश घारे सह त्यांच्या चमूने केली आहे. जवळपास एक महिन्याच्या कालावधीत ठाणेदार पदाची जबाबदारी घेऊन योगेश घारे यांनी अनेक वाईट धंद्यांना अंकुश घातले.
शहरात रात्री गस्त चालू असल्याने चोरी व महिलांची छेडखानी करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
अजून नागभिड पोलिस स्टेशन परिसरात अवैध जुगार, सट्टापट्टी, दारू, कोंबड बाजार असे अनेक मार्गांनी अवैध धंद्याना ऊत आले होते. तेसुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे.