मंत्रालयात दलाली करणाऱ्या शेखर भोयर आणि दिलीप खोडे यांना २५ लाखांची लाच घेतांना अटक.

0
47

अमरावती – मंत्रालयात दलाली करणाऱ्या अमरावती येथील दोघांना 25 लाखांची लाच घेतांना नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. दिलीप वामनराव खोडे वय 50 वर्ष, पद – टेक्नीशियन एमआयडीसी, अमरावती.,शेखर भोयर, रा. अमरावती. असे कारवाई करण्यात आलेल्या दलालांची नावे असून आरोपी यांनी तक्रारदार यांचे विरूद्ध त्यांचे कार्यालयातील महिला अधीकारी यांनी दिलेल्या दोन तक्रारी मध्ये चौकशी थांबविणे साठी प्रत्येकी ५०,००,०००/- असे ऐकून 1 कोटी रुपयाची मागणी केली.

माहितीनुसार यातील तक्रारदार यांचे विरुद्ध आमदार .वजाहत मिर्झा , विधान परीषद म. राज्य यांचे कडे तक्रारदार यांचे विभागातील महिला अधीकारी यांनी केलेल्या तक्रारीमध्ये विधानपरिषद म.राज्य मध्ये प्रश्न उपस्थित न करणे व तक्रारीवर कोणतीही कारवाई न होता परस्पर मिटविण्याकरिता दिनांक 28/03/2023 आरोपी यांनी दोन केसेसचे प्रत्येकी 50,00,000/- असे ऐकून 1 कोटी रुपयांची मागणी केली. दिनांक 28/03/2023 रोजी आलोसे यांनी तक्रारदारास तडजोडी अंती 25,00,000/- रु.ची लाच रक्कम मागणी करून आरोपी क्र.१ यांनी पंचासमक्ष स्वीकारल्याने रंगेहात पकडण्यात आले. आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.