तांडा येथे लग्नात दोन तरुणांच्या खुनाचा प्रयत्न

0
61

गोंदिया, दि.31- लग्न म्हटले की डीजेची धूम ठोकली जाते;परंतु फक्त नाचण्यावरून लग्नात वाद होत आहेत.असाच एक प्रकार गोंदिया तालुक्यातील तांडा येथे लग्न समारंभात घडला.यात चक्क चाकूने भोसकून दोन तरुणांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला.ही घटना २६ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत घडली.तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत लग्न होते.या लग्नातील वरातीत हातात चाकू घेऊन नाचणाऱ्या तरुणाने दोन तरुणांवर चाकूने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला.पवन इंद्रराज मेश्राम (२०,रा.तां डा ) व रितिक धनलाल मौजे (२०, रा.अदासी) असे गंभीर जखमी असलेल्या तरुणांची नावे आहेत.गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथील आरोपी रितेश मूलचंद उके (२०) हा लग्नात हातात चाकू घेऊन नाचत होता.नाचताना झालेल्या वादात पवन मेश्राम व रितिक मौजे या दोघांना चाकूने मारून गंभीर जखमी केले.या घटनेसंदर्भात अश्विन सूरजलाल शेंडे (२०,रा.अदासी ) यांच्या तक्रारीवरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम ३०७, ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे करीत आहेत.