दारूसह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
20

गडचिरोली- अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून रात्रीच्या सुमारास पोलिसांनी हरणघाट मार्गावर सापळा रचून नाकांबदी केली. मात्र, पोलिसांना बघताच दारू तस्कराने बॅरिकेट्स तोडून वाहन सुसाट सोडले. पोलिस कर्मचार्‍यांनी वाहनाचा पाठलाग केला. सिनेस्टाईल चाललेल्या या पाठलागाच्या थरारात देशी-विदेशी दारूसह पीकअप वाहनासह १७ लाख ८१ हजार ६00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची यशस्वी कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली. सदर कारवाई २९ मार्चच्या रात्री पार पडली. याप्रकरणी वाहनचालकाचा सोबती अमित बारई रा. गौरीपूर ता. चार्मोशी यास अटक आली. तर वाहनचालक राकेश मशीद हा फरार झाला.
चामोर्शी हद्दीतील दारू तस्कर शंकर अन्ना हा आपल्या सहकार्‍यांच्या मार्फतीने चंद्रपूर जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणात दारुची खेप आणणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी हरणघाट मार्गावर बुधवारी रात्रोदरम्यान सापळा रचून नाकाबंदी केली होती. दारूची वाहतूक करीत असलेल्या पिकअप वाहनाला पोलिसांनी थांबविण्याचा इशारा केला. परंतु, पोलिसांच्या इशार्‍यास न जुमानता बॅरिकेटस तोडुन पळ काढला. पोलीसांनीही क्षणाचा विलंब न करता त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. पीकअप चालकाने जंगल मार्गाने चार्मोशी व आष्टी पोलिस ठाण्यातील वेगवेगळय़ा गावात नेले. पोलिसांनीही त्याचा पाठलाग सुरू ठेवला. दारू तस्कर व पथकांमध्ये चाललेल्या पाठशिवणीच्या हा थरार काही वेळ चालल्यानंतर दारूतस्करी वाहनचालकाने सोनापूर गावाजवळ वाहन सोडून चालक फरार होण्यास यशस्वी झाला. मात्र पोलिसांनी वाहनचालका सोबत असलेल्या एका अटक केली. या प्रकरणी चामोर्शी पोलिस ठाण्यात कलम ३५३ भादंवि सहकलम ६५ (अ), १८ (२), ८३ मदाका सहकलम १८४ मोवाकाअन्वये शंकर अन्ना रॉय, राकेश मशीद व अमित बारई या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदर कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल आव्हाड, पोलिस उपनिरीक्षक दीपक केुभारे, अकबर पोयाम, प्रशांत गरफडे, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, मंगेश राऊत, सुनील पुलावार, सचिन घुबडे, मनोहर येलम, शगीर शेख यांनी पार पाडली

असा रंगला पाठशिवणीचा थरार
अवैध दारु वाहतुक करणार्‍या वाहन चालकाने पोलिसांना बघतात आपण पकडले जाऊन कारवाई या भितीने वाहन जंगल मार्गाने तसेच चामोर्शी व आष्टी पोलिस ठाण्यातील वेगवेगळ्या गावात नेले. मात्र, पोलिसांनीही धीर न सोडता १00 ते १२५ किमी पयर्ंत सतत त्यांचा पाठलाग सुरुच ठेवला. अखेर चामोर्शी पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या सोनापूर गावाजवळ वाहन सोडून चालक त्याच्या साथीदाराने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करीत वाहनचालकाच्या सोबत्याला ताब्यात घेतले.वाहनातून देशीच्या १३९, विदेशी दारूच्या ५ पेट्या जप्त
अंधारात चाललेल्या दारु तस्कर व पोलिसांच्या या थरारात अवैधरित्या दारुची वाहतूक होणारे वाहन पकडण्यात यश आले. यावेळी वाहनाची तपासणी केली असता वाहनात देशी दारुच्या १३९ पेट्या व विदेशी दारूच्या ५ पेट्या आढळून आल्या. या दारूसह वाहतुकीकरीता वापरलेले पिकअप वाहन, असा एकूण १७ लाख ८१ हजार ६00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.