समृद्धी महामार्गावर भरधाव कार थेट ट्रक खाली चिरडली; 1 ठार, 2 जण गंभीर जखमी

0
21

बुलढाणा- समृद्धी महामार्गावर ट्रकखाली कार चिरडून एक जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. काळजाचा थरकाप उडावा असा हा अपघात आज घडला. जखमींवर सिंदखेडराजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही वाहने एवढ्या वेगात होती की, कार ट्रक खाली चिरडली अन् फसली गेली.

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका चालूच आहे. समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉरवर सिंदखेडराजा नजीक भरधाव इनोव्हा कार ही ट्रकवर धडकली आणि भीषण अपघात झाला.

ईनोव्हा कारमधून तिघेजण शिर्डीहून नागपूरकडे जात होते. त्यावेळी कारचा वेग जास्त होता ती तार ट्रकला धडकली यात तिचा समोरील अर्धा भाग ट्रकखाली घुसला. अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्यात. जखमींवर सिंदखेडराजा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दोन्ही जखमींची प्रकृतीही चिंताजनक आहे. अपघातानंतर काही काळ नागपूर कॉरिडॉरवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.