25.9 C
Gondiā
Friday, August 28, 2026
Home गुन्हेवार्ता नोकरीसाठी दिले बनावट प्रमाणपत्र

नोकरीसाठी दिले बनावट प्रमाणपत्र

0
59
file photo

गडचिरोली : पोलीस भरतीत प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र जोडणाऱ्या पाच युवकांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. यातील एक आरोपी फरार असून त्याच्या शोधात पोलीस पथक रवाना झाले आहे.

एप्रिल महिन्यात गडचिरोली पोलिसांनी भरती प्रक्रिया पूर्ण केली. त्यात विविध आरक्षणानुसार पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली. परंतु कागदपत्र छाननीदरम्यान मिळालेल्या गोपनीय तक्रारीवरून पोलिसांनी पडताळणी केली असता त्यात काही उमेदवारांनी बीड आणि नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट दाखले जोडल्याचे आढळून आले.यावरून स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. दरम्यान आरोपींना याची चुणूक लागताच ते फरार होण्याच्या मार्गावर होते, मात्र स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पाच युवकांना अटक केली. तर एक आरोपी फरार झाला. पोलीस सूत्रांनी कारवाईला दुजोरा दिला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात आणखी काही उमेदवारांनी बनावट प्रमाणपत्र जोडले असल्याची शंका आहे. त्यामुळे आरोपींची संख्या वाढू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भरती प्रक्रिया अंतीम टप्यावर असतांना अचानक पोलीस अधीक्षक यांना निनावी पत्र प्राप्त झाले. सदर पत्रात सुरु असणाऱ्या भरती प्रक्रियेत तसेच मागील पोलीस भरतीत देखील काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्ताचा समांतर आरक्षण घेण्याकरीता गडचिरोली येथील एका इसमाच्या मदतीने बीड जिल्ह्यातील खोट्या कागदपत्रांचे आधारे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करून पोलीस भरतीकरीता आवेदन अर्ज केला व मागील भरतीत त्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राचा लाभ घेवून नोकरी मिळविली आहे. सदर अर्जाचे गांभीर्य बघुन पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांनी त्यांचे कक्षात स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिका-यांना बोलावून सदर अर्जाबाबत गोपनियरीत्या सखोल चौकशी करुन तात्काळ योग्य कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले.

पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे आदेश प्राप्त होताच अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी व पोलीस उपनिरीक्षक दिपक कुंभारे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक तयार करून चौकशी सुरु करण्यात आली. सदर चौकशी दरम्यान सुरु असलेल्या पोलीस भरतीत तात्पुरत्या निवड यादीत प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणाखाली निवड झालेल्या ४ उमेदवारांचे प्रमाणपत्र हे बीड जिल्ह्यातील असल्याचे निदर्शनास आले तसेच मागील भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणाखाली निवड होऊन पोलीस दलात नवप्रविष्ठ पोलीस शिपाई म्हणून रुजु झालेल्या ५ उमेदवारांपैकी २ उमेदवारांचे प्रमाणपत्रे बीड जिल्ह्यातील असल्याचे दिसुन आले. सर्व प्रमाणपत्राची चौकशी पथकाने बारकाईने पाहणी केली तेव्हा असे निदर्शनास आले की, एकाच स्थावर मालमत्तेसंदर्भात दोन वेगवेगळ्या इसमांना प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणप्रत देण्यात आले होते त्यातील एक नयप्रविष्ट पोलीस शिपाई म्हणून रुजु झालेला होता तर त्यातील दुसन्याची सुरु असलेल्या पोलीस भरतीत तात्पुरत्या निवड करण्यात आली होती. यावरून पोलीसांचा अधिकच संशय बळावल्याने त्यांनी बीड येथे जावुन प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रात दर्शविलेल्या स्थावर मालमत्तेच्या संदर्भात माहिती घेतली, तेव्हा, मोठ्या प्रमाणात तफावत दिसुन आली त्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणाचा लाभ घेतलेले नवप्रविष्ठ पोलीस शिपाई व निवड झालेले उमेदवार यांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता, त्यांनी त्यांचे कुठलेही पूर्वज बीड जिल्ह्यातील रहिवासी नसतांना किया त्यांची तेथील कुठलीही स्थावर मालमत्ता शासनाने प्रकल्पाकरीता संपादित केली नसतांना देखील खोट्या कागदपत्रांच्या आधारे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तयार करण्यात आले असल्याची कबुली दिली. एकंदरीत स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली कडून केलेल्या चौकशी दरम्यान सदर प्रमाणपत्रे बोगस असल्याची खात्री होताच पोलीस उपनिरीक्षक दिपक कुंभारे, स्थानिक गुन्हे शाखा यांचे लेखी फिर्यादवरुन पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अप.क्र. २९१/२०२३ कलम- ४१९, ४२०, ४६५ ४७१, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करून सदर गुन्ह्याचे गांभीर्य बघुन तपास पोलीस निरी भुसारी, स्थानिक गुन्हे शाखा यांचेकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे.