वर्धा : सामान्यांच्या प्रश्नावर अत्यंत आक्रमक राहणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक मंगेश विधळे (५१) यांचा आज सकाळी नऊ वाजता झालेल्या अपघातात मृत्यू झाला.विधळे आज अमरावतीवरून आपल्या दुचाकीने त्यांच्या सोनोरा ढोक या गावी येण्यास निघाले होते. गावालगत असतानाच त्यांच्या गाडीला बोलेरो या मालवाहू गाडीची धडक बसली. हेल्मेट तुटून पडले. त्याच अवस्थेत त्यांना पुलगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.मराठा सेवा संघाचा उजवा हात म्हणून त्यांची ओळख होती. संघटना घराघरात पोहोचविण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले





