अंमली पदार्थाचे सेवन करणार्या 20 जणांवर पोलिसांची कारवाई

0
16

गोंदिया,दि.25-शहरांतील गोंदिया शहर, रामनगर, परिसरात घडणाऱ्या घटना चोरी, जबरी चोरी, घरफोडी, खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत यासारखे गुन्ह्यांचे वाढलेले प्रमाण व नवयुवक आणि अल्पवयीन मुलांमध्ये अंमली पदार्थाचे सेवन करून गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाढता कल लक्षात घेता पोलीस अधिक्षकांनी सुज्ञ नागरिकांच्या सुचनांची दखल घेत अमंली पदार्थाचे सेवण करणार्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दिनेश लबडे यांनी नशापाणी करून अंमली पदार्थ (गांजा, पावडर, गर्दा, गुंगिकारक पदार्थ ) चा वापर करून गुन्हे करणाऱ्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसवण्या साठी , गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समूळ उच्चाटन करण्याकरिता गोंदिया शहर, रामनगर, परिसरात अंमली पदार्थ (गांजा, पावडर, गर्दा, गुंगिकारक पदार्थ ) चां वापर करून नशापाणी करणाऱ्यांवर 20 जणांवर कारवाई  केली.

या अनुषंगाने दिनांक 23/05/2023 रोजी ते 25/05/2023 दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथक तसेच पोलीस ठाणे गोंदिया शहर व रामनगर येथील विविध पथकाद्वारे गोंदिया शहर, रामनगर परिसरात नशापाणी करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात येवून धाड कारवाई करून अंमली पदार्थ (गांजा, पावडर, गर्दा, गुंगिकारक पदार्थ ) चा वापर व सेवन करणा ऱ्याविरुद्ध कलम 27 अमली पदार्थ अधिनियम सन 1985 कायद्यान्वये पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे – 18 व रामनगर येथे – 2 अश्या एकूण 20 इसमावर कार्यवाही करत त्यांच्या कडून अमली पदार्थाचे साहित्य मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे.

अमली पदार्थाच्या वापर करून सेवन करणाऱ्या खालील इसमाविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. वैभव उमेश पोगडे वय 22 वर्ष राहणार शेंदुर्वाफा तालुका साकोली जिल्हा भंडारा हल्ली मुक्काम गौतमनगर गोंदिया, जय सुरेश नागरीकर वय 26 वर्ष राहणार छोटा गोंदिया,) रोहन भागवत बागडे व 24 वर्ष राहणार चावडी चौक छोटा गोंदिया. शेखर रामप्रसाद घारपिंडे वय 40 वर्षे राहणार चव्हाण चौक श्रीनगर गोंदिया, रामदास बुधराम कावडे व 42 वर्षे राहणार गौतम नगर, ऋषी दिलीप तिवारी वय 20 वर्ष राहणार रामनगर गोंदिया,सुजान शाहरुख खान 18 वर्षे राहणार आंबा टोली गोंदिया,आयुष राधेश्याम भालाधरी वय 18 वर्षे राहणार सिंगलटोली गोंदिया,जितेंद्र शालिकराम नागभीरे वय 46 राहणार गौतम नगर गोंदिया,जयंत गणपत राऊत वय 48 वर्षे राहणार गौतम नगर गोंदिया,आकाश किशोर बावणे वय 20 वर्षे राहणार यादव चौक गोंदिया,सागर कैलास वाघमारे वय 28 वर्षे राहणार हनुमान मंदिर जवळ यादव चौक गोंदिया,हिमांशू प्रकाश पटले वय 28 वर्षे राहणार टी.बी टोळी गोंदिया,सुबोध भूषण बोपचे वय 34 वर्षे राहणार टी.बी टोळी गोंदिया,बबलू श्यामकिशोर आरखेल वय 23 राहणार सिंधी कॉलनी गोंदिया,वरून राजकुमार समुद्रे वय 22 वर्षे राहणार भीम नगर गोंदिया,राकेश परसराम चंदनिया वय 28 राहणार सरकारी तलाव हनुमान मंदिर जवळ गोंदिया,अमर महादेव गजभिये वय 40 वर्षे राहणार कचरा मोहल्ला गोंदिया,राकेश हेमराज गोंडाणे वय 40 राहणार सावराटोली गोंदिया,आदिल अश्फाक शेख वय 20 वर्षे राहणार सावराटोली गोंदिया यांचेविरूद्ध पोलीस ठाणे गोंदिया शहर व रामनगर परिसरात धाड कारवाई करून गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत.

गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे गोंदिया शहरातील, रामनगर तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलेल्याना तसेच नशापाणी, अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळले ल्याना आवाहन करण्यात येते की, त्यांनी अमली पदार्थाचा वापर व सेवन , नशापाणी न करता सामान्य जीवन जगून गुन्हेगारी प्रवृत्ती सोडण्याचे आवाहन करण्यात येत आहे .