३० हजाराची लाच घेताना नगरपरिषदेचा वरिष्ट लिपिक जाळ्यात

0
86

गोंदिया नगर परिषदेच्या नगर रचना विभागात कार्यरत वरिष्ट लिपिक – अब्दुल सलाम वल्द हबीब कुरेशी वय 51 वर्ष
रा. नुरी मस्जित  मागे, सिव्हिल लाईन गोंदिया, जिल्हा – गोंदिया
याना मागणी केलेल्या 80,000 रु.च्या लाच प्ररकरणात सापळा रचून ३० हजाराची लाच घेताना आज लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले़.तक्रारदार यांचे व त्यांचा आई आणी बहिणीचा नावाने असलेले गोंदिया नगरपरिषद हद्दीतील घराची अकृषक वापराची परवानगी जिल्हाधिकारी गोंदिया यांचे आदेशाने रद्द झालेली असल्याने आरोपी याने तक्रारदार यांना सदर घराचा आणी त्याघराचे प्लॉट चा गुंठेवारी N A करून देण्याकरिता तक्रारदारास 80,000 रु लाच रकमेची मागणी करून त्यापैकी 30,000 रु घेतले आणी उर्वरित 50,000 रु लाच रक्कम आणून देण्यास सांगितले .
पळताळणी दरम्यान पंचासमक्ष आरोपी याने तक्रारदाराकडून याआधी 30,000 रु घेतल्याचे मान्य करून उर्वरित 50,000 रु लाच रकमेची तक्रारदारास मागणी करून लाच रक्कम प्राप्त करण्याचा प्रयत्न केला .
आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन – गोंदिया शहर,जिल्हा गोंदिया येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

▶️ मार्गदर्शन : मा. पोलीस अधीक्षक श्री राहुल माकणीकर सर
ला.प्र.वि. नागपूर.
मा. श्री महेश चाटे सर अप्पर पोलीस अधीक्षक ला प्र वी नागपूर

▶️ पर्यवेक्षण अधिकारी :-
श्री पुरुषोत्तम अहेरकर
पोलीस उप अधीक्षक
ला प्र वी, गोंदिया

▶️तपास अधिकारी :-
श्री अतुल तवाडे
पोलीस निरीक्षक
ला प्र वी ,गोंदिया
सापळा कारवाईत पोलीस उप अधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, पोलीस निरीक्षक अतुल तवाडे,स.फौ. विजय खोब्रागडे, पो हवा. संजय बोहरे ,नापोशी संतोष शेंडे,अशोक कापसे ,कैलास काटकर, प्रशांत सोनवाने,संगीता पटले चालक दीपक बतबर्वे सर्व ला.प्र.वि. गोंदिया हे सहभागी झाले होते.