मुंबई : मजरेवाडी येथील अंत्रोळीकर नगर भाग 2 मधील 64 संबंधि बनावट खरेदी खत बनवून जमीन खरेदी केल्याप्रकरणी आरोपी नामे गोविंद हरिश्चंद्र राठोड यास जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
यात हकीकत अशी की, यातील फिर्यादी नामे अंबादास व्यंकटेश चव्हाण यांच्या दिनांक 17/०८/2023 रोजी आरोपी नामे गोविंद हरिश्चंद्र राठोड यांनी व इतर तीन आरोपींनी संगणमत करून फिर्यादीच्या मालकीची अंत्रोळीकर नगर भाग दोन मधील प्लॉट नंबर 64 यासी नवीन सर्वे नंबर १७/२ या मिळकतीचे बनावट व खोटे खरेदीखत अस्तित्वात आणून फिर्यादी तसेच मे. दुय्यम निबंधक उत्तर सोलापूर-२ यांची फसवणूक केली वगैरे अशा आशयाची फिर्याद सदर बाजार पोलीस स्टेशन येथे भा.द.वी कलम. ४२०,४६७,४६८,४७१,४१७,३४ प्रमाणे २९/०८/२०२३ फिर्याद दाखल केली होती. सदर प्रकरणात आरोपी गोविंद हरिश्चंद्र राठोड यांनी ॲड कदीर औटी, ॲड श्रीशैल राचुरकर, ॲड राहुल जानराव, ॲड दत्तात्रय कापुरे यांनी आरोपीच्या वतीने में जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे जामीन अर्ज दाखल केला होता त्यामध्ये आरोपीच्या वतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.