सराईत आरोपी नईम शेखची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून खून

0
3
वाढदिवसाच्या शुभेच्छा

भंडारा,दि.२५:: मोक्का प्रकरणातील सराईत आरोपी नईम शेखची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून खून झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ आज (ता. २५) सायंकाळच्या सुमारास घडली. या हत्याकांड प्रकरणात फरार असलेला या हत्याकांडाचा मुख्य आरोपी संतोष दहाटने आपल्यावर झालेल्या हल्ल्याच्या बदला घेण्यासाठी नईम शेख खानचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. तडीपार असलेला कुख्यात गुंड संतोष दहाटने आपल्या नागपूर येथील सात आरोपी मित्रांसोबत मिळून हे हत्याकांड घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही कामानिमित्त बालाघाट तिरोडीवरूण मृतक नईम शेख, आपले साथीदार कालू माटे, जावेद पठाण आणि शहीद पठाण सोबत चार चाकी वाहनाने तुमसर कडे येत होते. संतोष दहाट आपल्या सात साथीदारांसोबत त्यांचा पाठलाग करत होता. गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ येताच ड्रायव्हरच्या बाजूला बसलेल्या नईम खान वर सुरुवातीला गोळी झाडण्यात आली.

पहिली गोळी कारच्या दाराला लागली. दरम्यान गाडी थांबवून नईम शेखवर धारदार चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्याच्या वेळी नईमचे तिन्ही साथीदार पळून गेले. नईम मेल्याचे समजताच संतोष दहाट व त्याचे साथीदार घटना स्थळावरून पळून गेले. पुढे मृतक नईमच्या साथीदारांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे नईम खान याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. विशेष बाब अशी की या प्रकरणी चार आरोपींना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व आरोपी नागपूरचे आहेत. त्यांनी संतोष दहाटने प्रकरण घडवून आणल्याचे कबूल केले आहे.