सोलापूर : दि ०५ : अल्पवयीन मुलीस विविध प्रकारचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी दयानंद मिसाळ यल्लमवाडी ता. मोहोळ यास विशेष न्यायाधीश, जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांनी जामीन मंजूर केला आहे.
यात हकीकत अशी की अल्पवयीन मुलगी ही दिनांक 16/05/2023 रोजी राहत्या घरातून मोजे. डिकसळ तालुका मोहोळ, यातील आरोपींनी पिडीतेला विविध प्रकारचे अमिष दाखवून व फूस लावून पळवून नेले होते. वरील प्रकरणात फिर्यादीने पिडीतेची चौकशी केली असता ती कोठेही मिळून आली नाही. यासंदर्भात फिर्यादीने मोहोळ पोलीस स्टेशन अंतर्गत भा.द.वी.363 366, 376(2)(N),34 व पोक्सो कलम 4,6,8,12,17 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात फिर्यादीने वरील आरोपींचे विरोधात अल्पवयीन पिडीते सोबत लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद दाखल केली होती. त्यामुळे आरोपींनी जामीनासाठी सोलापूर विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती .सदर प्रकरणातील ॲड.कदीर औटी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. यात आरोपीतर्फे अॅड.कदीर औटी, अॅड दत्तात्रय कापूरे , ॲड कपिल चलवादी यांनी काम पाहिले.