गाडीला कट मारल्याच्या वादातून एकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

0
21

गोंदिया,13 नोव्हेंबर : दिवाळीच्या दिवशीच गोंदिया शहरात मध्यरात्री हत्येचा थरार घडला. एका 23 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आरोपी अज्ञात असून त्याचा शोध सुरू आहे. गाडीला कट मारल्याच्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. अर्पित उर्फ बाबू ऊके वय (23) असे मृतकाचे नाव असुन तो गोंदियातील आंबाटोली येथील आहे.मृतक व आरोपी यांच्यात गाडीला कट मारल्यावरून वाद झाला. ही घटना मध्यरात्री घडली. आरोपीने मृतकावर धारधार शस्त्राने हल्ला केला. यातच घटनास्थळी अर्पित उर्फ बाबू याचा मृत्यु झाला.

मृतक अर्पित उर्फ बाबू ओमप्रकाश उके (२३) रा. आंबाटोली, गोंदिया हा त्याचा मित्र राहुल डहाट याच्यासोबत दुचाकीवरून जात असताना ट्रिपल सीट दुचाकीवरून आलेल्या आरोपीला मारहाण करण्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि किरकोळ भांडणाचे पर्यावसन अखेर तरुणाच्या खूनात झाले. तिघांनी मिळून अर्पित उर्फ बाबू ओमप्रकाश उके याच्यावर धारदार शस्त्राने वार केले ज्यात चाकूने आतडे कापल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला.पीडितच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून तीन फरार आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बस्तोडे करीत आहेत. विशेष म्हणजे दिवाळीच्या रात्री शहरातील रस्त्यांवर खळबळ उडाली असून सर्वत्र फटाक्यांच्या आवाजात घडलेल्या या हत्याकांडाने सर्वांनाच हैराण केले आहे.पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनात आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना केले आहेत.