भंडाऱ्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात चार जखमी

0
43

दोन घरांचे प्रचंड नुकसान

भंडारा : दिवाळीचा फराळ बनवीत असताना अचानक घरगुती गॅस सिलिंडरमध्ये वायू गळती होऊन आग लागली. याची माहिती होताच, घरातील सर्व बाहेर गेलेत. मात्र आग विझविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आगीच्या ज्वाळा लागल्यानं यात चार जण जखमी झालेत. दरम्यान, त्यांना तातडीनं घराबाहेर काढल्यावर सिलिंडरचा प्रचंड स्फोट झाला. यात दोन घरांचे प्रचंड नुकसान झाले असून यात दोन महिलांसह चार जण जखमी झालेत. सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
ही घटना भंडारा शहरातील खात रोड मार्गावरील तुलशिनगर येथील प्रकाश कोहळे यांच्या घरी घडली असून त्यांच्या घराचा स्लॅब पूर्णतः फुटला. यात लगतच्या देवानंद मेश्राम यांच्याही घराचे प्रचंड नुकसान झाले. कुंती कोहळे (60), रेणुका कोहळे (32), राजेंद्र दमाहे (45), संजय सदावर्ती (44) असं जखमींचे नावं आहेत.