करमाळा तालुक्यातील कोर्टी परिसरात खुलेआम देहविक्री

0
3

कोर्टी परिसरातील लकी लाॅज चालकाचा प्रताप.
पोलिसांच्या आशीर्वादाने चालतोय जोरात वेश्या व्यवसाय..

आमिर मुलाणी/सोलापूर : करमाळा तालुक्यातील कोर्टी गावात लकी लाॅजवर पोलिसांच्या आशीर्वादाने जोरात वेश्या व्यवसाय सुरू आहे.
अल्पवयीन ,शाळकरी ,मुले वेश्या व्यवसायच्या आहारी गेल्याचे प्रमाण खूप जास्त वाढलं असुन जाणीवपूर्वक करमाळा पोलिस डोळे झाक पणा करतं आहे. कर्नाटक, बंगाल, मुंबई शहरातून थेट करमाळा तालुक्यातील कोर्टी गावांमधील लकी लॉज वरती मुलींची देह विक्री केली जात आहे. यामुळे करमाळा तालुक्यातील मुले शिक्षणापासून दुर होत चाललेले आहेत व वेश्या व्यवसायाच्या आहारी चाललेले आहेत. लकी लाॅज वरती काही दिवसांपासून या हॉटेलमध्ये अनधिकृतरित्या वेश्या व्यवसाय चालू आहे, लाॅज वरती मुलींसोबत २० मिनिटे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील एजंट १२०० रूपये तर पुर्ण रात्र थांबण्यासाठी ३००० हजार रुपये घेतले जात असल्याची चर्चा आहे.या मुलींवरती जबरदस्ती करून पर राज्यातून महाराष्ट्र मध्ये आणले जात आहे व यांच्या वरती जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास मजबूर केले जात आहे . आशा एजंट लोकांना पोलीस बेड्या ठोकण्यास का टाळाटाळ करत आहेत? यामागे कोणाचे वरदस्थ आहे का? त्यामूळे नेमक पाणी कुठं मुरत आहे ?याकडे संपुर्ण करमाळा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे .करमाळा तालुक्यातील पोलिसांवरचा विश्वास संपत चालला आहे. कायद्याचे रक्षण करणारे पोलीसच कारवाई करत नसतील तर जनतेने काय करावे. करमाळा तालुक्यातील कोर्टी गाव म्हणजे अतिशय महत्त्वाचं आणि मध्यभागी असलेला परिसर व काही अंतरावरती पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या कोर्टीगांवत लगत करमाळाची महत्त्वाची बाजारपेठा आहे. मात्र याच करमाळा तालुक्याला आता वेश्या व्यवसायाचं ग्रहण लागलं आहे. करमाळा तालुक्याची सांस्कृतिक, राजकीय आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख आहे.पण हेच करमाळा तालुक्यातील कोर्टी आता वेश्या व्यवसायाचं देखील केंद्र बनले आहे. तेही पोलिस व प्रशासनाच्या आशीर्वादानं करमाळा तालुक्यातील कोर्टी उच्चभ्रू परिसरात वेश्याव्यवसाय सुरु आहे. तर ज्यांना वेश्या परवडत नाही त्यांच्यासाठी सोबत नवीन कस्टमर घेऊन आल्यानंतर डिस्काउंट देखील दिला जातोय. या वरती कोण कारवाई करणार असा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे.