वर्गशिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार; पत्नीनेच केला भांडाफोड

0
11

गडचिरोली : आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला मुलचेरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विश्वजीत मिस्त्री (३८) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याचा पत्नीनेच या प्रकरणाचा भांडाफोड केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडितेचा वर्गशिक्षक आहे. मागील काही महिन्यांपासून दोघांमध्ये संबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने विद्यार्थिनीसोबत वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित केले. दरम्यान, आरोपी शिक्षकाच्या पत्नीला संशय आल्याने तिने त्याचा मोबाईल तपासला असता त्यात दोघांमधला संवाद आढळून आला. हा प्रकार तिने मुख्याध्यापकाच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यावरून आरोपी शिक्षक विश्वजीत मिस्त्री याच्यावर १९ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास अत्याचार व ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दखल करून त्याला ताब्यात घेतले.