वैनगंगा नदीत डोंगा उलटून सहा महिला बुडाल्या

0
22

गडचिरोली : वैनगंगा नदीच्या गणपूर (रै.) घाटावरून निघालेली डोंगा पाण्यात बुडाल्याने ६ महिला वाहून गेल्याची घटना आज २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली आहे.या घटनेत एका महिलेचे मृतदेह मिळालेले असून अद्याप ५ महिला बेपत्ता आहेत. तर एका महिलेला वाचविण्यात आले आहे. या घटनेत गणपूर (रै.) येथील पोलीस पाटलाची पत्नीसुध्दा वाहून गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सदर महिला मिरची तोडण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यातील गावात डोंग्याने सहाय्याने जात होत्या. अचानक पाण्यात नाव वाहून गेल्यामुळे सात महिला आणि नावाडी बुडाले. नावाडी पोहून बाहेर निघून गेला व एका महिलेला वाचविण्यात आले. चामोर्शी पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. शोधमोहीम वेगात सुरू आहे.