गोंदिया : शहर पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या कृष्णपुरावार्ड निवासी डॉ.लोकेश चर्तुभुज मोहणे,(वय ४३) कृष्णपुरावार्ड, गोंदिया 20 हजार रुपयाची खंडणीची मागणी करणार्या आरोपींनी फिर्यादीचे दुचाकी वाहन जाळल्याची घटना 6 फेब्रुुवारी रोजी घडली होती.या घटनेची तक्रार फिर्यादी डाॅ.मोहणे यांनी नोंदविताच शहर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून आरोपी राज ऊर्फ मारी, मुकेश तांडेकर ऊर्फ डाव, सुशांत जाधव व धर्मराज ऊर्फ धर्मा बावणकर यांना 12 तासाच्या आत अटक केली.सविस्तर असे की आरोपीनी दिनांक ०६/०२/२०२४ रोजी २०,०००/- रुपये खंडणीची मागणी केली असता फिर्यादीने २०,०००/- रुपये खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीनी फिर्यादीचे ताब्यातील मोटार सायकल जबरदस्तीने हिसकावुन घेवुन गेले व मोटार सायकलला आग लावुन पेटवून दिली होती. फिर्यादीचे तक्रारवरून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अप.क्र.५४/२०२४ कलम ३८४, ४३५, ३४ भादवी. अन्वये दिनांक ०८/०२/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासात पोलीस पथकाने गोपनिय सुत्राचे आधारे आरोपीतांचा शोध घेतला.यात आरोपी राज ऊर्फ मारी सुशिल जोसेफ, वय २०,मुकेश ऊर्फ डाव विनोद तांडेकर, वय ३०,सुशांत रतन जाधव, वय ३४,धर्मराज ऊर्फ धर्मा दादी बावणकर, वय ३२ सर्व रा. गौतमनगर, गोंदिया यांना दिनांक ०९/०२/२०२४ रोजी अटक केली. सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि.सोमनाथ कदम, पो.स्टे. गोंदिया शहर हे करीत आहेत. सदर आरोपीना मुख्य न्यायालय, गोंदिया यांचे समक्ष हजर केले असता न्यायालयाने २२/०२/२०२४ पर्यंत न्यायालयीन कोठडी मंजुर करुन सर्व आरोपीची जिल्हा मध्यवर्ती कारागृह भंडारा येथे रवानगी करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस निरिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा,उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीनी बानकर यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली डो. बी. पथकचे स.पो.नि. सोमनाथ कदम, स.फौ. घनश्याम थेर, पो.हवा. जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, कवलपाल भाटीया, निशिकांत लॉदासे, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, संतोष भेंडारकर, म.पो.हवा. रिना चौव्हाण, पो.शि. अशोक रहांगडाले, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार यांनी केली आहे.