Home गुन्हेवार्ता १० लाखाच्या गोवा बनावटीच्या दारूसह १५ लाखाची गाडी असा एकूण २५ लाखाचा...

१० लाखाच्या गोवा बनावटीच्या दारूसह १५ लाखाची गाडी असा एकूण २५ लाखाचा मुद्देमाल जप्त

0

कुडाळ पोलीसांची बुधवारी पहाटे धडक कारवाई…

तर वेंगुर्ले शहरात व तालुक्यात गेली दिड दोन वर्षे गोवा बनावटीच्या दारूची जोरदार विक्री सुरू असताना मात्र

वेंगुर्ले पोलीसांनी डोळ्यावर पट्टी बांधल्याचे बोलले जात आहे.

कुडाळ:-गोवा बनावटीची दारूची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी दोघांवर कारवाई केली आहे.त्यांच्याकडून १० लाखाच्या दारूसह १५ लाखाची गाडी असा एकूण २५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्वेश भास्कर केरकर (वय २७ रा. सातार्डा ता. सावंतवाडी) व गौरव गिरीधर केरवडेकर (वय ३४ रा. केरवडे, ता. कुडाळ) अशी दोघांची नावे आहेत.त्यातील केरवडेकर हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.

ही कारवाई बुधवारी पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर बिबवणे येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे यांनी त्या दोघांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केरकर याला अटक करण्यात आली असून केरवडेकर याचा शोध घेण्याचे काम कुडाळ पोलीस करत आहेत. आज, बुधवारी दुपारी महामार्गावरील बिबवणे येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत गोवा बनावटीचे बॉबज व्होडका १०४ बॉक्स अशा ४ हजार ९९२ सीलबंद बाटल्या (१२० रू. प्रमाणे ५९ हजार ९४० रू.,) आणि हॉवर्ड फाईन व्हिस्की ३८४ सीलबंद बाटल्या (४६ हजार ०८० रू.), डीएसपी ब्लॅक ३४ हजार ५६०, नॅशनल गोल्डन व्हिस्की (१७ हजार २८० रू.), हनी ब्लंड ब्रेडी (१ लाख ४४ हजार), मॅक डोनाल्ड व्हिस्की (६३ हजार ३६० रू.), हनी गाईड ब्रांडी (५१ हजार ८४० रू.), रॉयल ब्रँड (५७ हजार ६००), किंगफिशर स्ट्राँग (२३ हजार ४६ रू.), १० लाख (कार महिंद्रा एसयूव्ही), मारुती स्विफ्ट कार (५ लाख) असा एकूण २५ लाख ३६ हजार ८०० रू. असा ताब्यात घेण्यात आला.

Exit mobile version