अर्थ सभापती टेंभरे आज सादर करणार जि.प.चा अर्थसंकल्प

0
15

गोंदिया,दि.15- गोंदिया जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आज 15 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेचे अर्थ सभापती योपेंद्रसिह( संजय)टेंभरे हे आपल्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प दुपारी 2 वाजता सादर करणार आहेत.टेंभरे यांनी गेल्यावर्षी 13 मार्च रोजी आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला होता.त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्यांच्या उपचारासाठी 50 हजार ते 5 लक्षपर्यंतचा निधी विशेष मंजूर केलेला होता.आत्ता यावर्षीच्या  अर्थसंकल्पात काय नाविण्यपूर्ण योजनांचा पिटारा जिल्हा परिषद सदस्यांकरिता उघडतात याकडे लक्ष लागले आहे सभापती टेंभरे उत्पन्नवाढीसह काय करतात हे बघावे लागणार आहे.