घातक शस्त्रे- लोखंडी तलवारी बाळगल्याप्रकरणी एक जेरबंद

0
18

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गोंदिया,दि.21- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा घालून गंंगाझरी पोलीस ठाणे हद्दीतील फत्तेपूर येथील एका ईसमास बेकायदेशिररित्या विनापरवाना स्वतः चे घरी घातकशस्त्र लोखंडी तलवारी बाळगल्याप्रकरणी जेरबंद करण्यात आले आहे.सदर इसमाकडून 11 नग तलवारी किंमती अंदाजे 11,000/- रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी दिलेल्या निर्देश्वानये येत्या काळात होणाऱ्या निवडणुका आणि जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेत करण्यात आली. वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे स्था. गु . शा. पथकाद्वारे 20 फेब्रुवारी रोजी बादल खोब्रागडे रा. फत्तेपूर याने घरी भविष्यात घातपात घडवून आणण्याचे उद्देश्याने अवैधरित्या घातक शस्त्रे तलवारी/कोयते लपवून ठेवल्याची माहिती मिळाली.त्या  माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी स्था.गु. शा. पो. नि. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी- अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके तयार करून अवैधरीत्या घातक हत्यार/ शस्त्रे (तलवारी/कोयते) बाळगणारा इसम नामे- बादल दलित खोब्रागडे वय 27 वर्षे राहणार- फत्तेपूर ता. जि. गोंदिया याचे घरी घातक शस्त्र तलवारी/ कोयते बाबत दिनांक 20/02/2024 चे दुपारी 13.05 वाजता सापळा रचून छापा घालून कारवाई केली. राहते घरी घर झडतीत स्वयंपाक खोलीतील कोपऱ्यात एका प्लास्टिक बोरीत ज्यात दोन गोणपाटाच्या पोतडीमध्ये गुंडाळून , लपवून ठेवलेल्या 11 नग लोखंडी तलवारी स्टील मुठ आणि लोखंडी पाता असलेल्या किंमती अंदाजे 11 हजार रुपयांच्या विनापरवाना बेकायदेशीर रित्या बाळगतांना मिळून आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेवून जेरबंद करण्यात आले. ताब्यात घेतलेला ईसम नामे – बादल खोब्रागडे यास घातक हत्यार/शस्त्र (लोखंडी तलवारी) बाळगण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्याचेकडे मिळुन आलेल्या लोखंडी तलवारी बाबत कसलेही कायदेशीर कागदपत्रे, अगर परवाना नसल्याचे सांगून त्याचा आत्तेभाऊ ईसंम नामे – गौतम उर्फ निगम उर्फ गामा संजय वाहाणे राहणार – वाजपेयी वॉर्ड, गोंदिया याची असल्याचे सांगितले.यावरुन बादल दलित खोब्रागडे वय 27 वर्षे राहणार- फत्तेपूर ता. जि. गोंदिया व  गौतम उर्फ निगम उर्फ गामा संजय वाहाणे राहणार – वाजपेयी वॉर्ड, गोंदिया यांच्याविरूद्ध पोलीस ठाणे गंगाझरी येथे अपराध क्रमांक- 58/2024 कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा, सहकलम 37 (1), (3), मुंबई पोलीस अधिनियम सन 1951, कलम 135 म.पो.का. अन्वये मपोउपनि- सायकर, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी ईसंम नामे-बादल खोब्रागडे यास मुद्देमालासह गंगाझरी पोलीसांचे स्वाधिन करण्यात आले आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास गंगाझरी पोलीस करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांचे निर्देशान्वये स्था. गु. शा. प्रभारी पो.नि. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्था.गु.शा. चे पथक- पोउपनी. महेश विघ्ने, मपोउपनि- वनिता सायकर, यांचे नेतृत्वात सफौ.अर्जुन कावळे, पोहवा. राजेंद्र मिश्रा, भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, महेश मेहर, सोमेंद्र तुरकर, रियाज शेख, इंद्रजित बिसेन, पोशि अजय रहांगडाले, घनश्याम कुंभलवार यांनी कामगिरी केलेली आहे.