बेपत्ता असलेल्या वृद्धाचा शव आढळला विहिरीत..!

0
15

तुमसर:– घरातून दोन दिवसा पासून बेपत्ता असलेल्या एका वृद्धाचा शव २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास विहिरीत पाण्यात तरंगत असल्याचा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यामध्ये  सुधाकर फत्तुजी गभने (७५) रा. विवेकानगर तुमसर असे मृतक ईसमाचे नाव आहे. मृतकाचे शव रात्रीपर्यंत विहिरीतून पोलिसांनी काढण्याकरिता यंत्रणा लावली होती.

मृतक सुधाकर दोन दिवसापासून हा घरातून बेपत्ता होता. दरम्यान घरातील मंडळींनी तुमसर पोलिसातबेपत्ता असल्याची तक्रार तुमसर पोलिसांत दाखल केली. मात्र २३ फेब्रुवारी रोजी साडे चार ते पाच वाजताच्या सुमारास विवेकानंद नगरातील एका विहिरीमध्ये काही लहान मुलं खेळत असताना त्यांना सुधाकर याचे प्रेत पाण्यामध्ये तरंगताना दिसला ‌दरम्यान तेथील मुलांनी व नागरीकांनी आरडाओरडा केली असता घटना स्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. त्यांनतर या घटनेची माहिती तुमसर पोलिसांना देण्यात आली आणि त्यांनतर मृतकाची ओळख पटवण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रेत अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय गीते करीत आहेत.