नाल्यात कार कोसळली; सैनिकाचा होरपळून मृत्यू

0
9

चंद्रपूर : नागपूर -चंद्रपूर या रस्त्यावरून प्रवास करीत असताना कार पुलाचे कठडे तोडून नाल्यात कोसळून पेट घेतल्याने आगीत होरपळून एका सैनिकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी भद्रावती शहरानजीक असलेल्या कोंढा नाल्यात उघडकीस आली.या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व अर्धवट जळालेला मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.दिपक बघेल (३५)राहणार मल्हारी बाबा सोसायटी भद्रावती असे मृताचे नाव आहे. दिपक हा जामनगर येथे आर्मीमध्ये कार्यरत होता. या पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मध्यरात्रीनंतर (२३ बी एच ६८५५सी) या क्रमांकाची मारुती इग्नेश ही कार नागपूर कडून भद्रावती कडे येत असताना ती कोंढा नाल्याच्या पुलावरील कठड्याला धडकून नाल्यात कोसळली. कोसळल्यावर या कारने पेट घेतला. कार चालक दिपक यांनी कार मधून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला बाहेर निघता न आल्याने कारला लागलेल्या आगीत त्याचा होरपळून मृत्यू झाला. सदर घटनेचा तपास ठाणेदार बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.