बुलढाणा,दि.१३- राष्ट्रमाता जिजाऊ यांचे माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील महसूल विभागातील तहसीलदार सचिन शंकरलाल जैस्वाल,वय ४३ वर्ष,याला ३५,००० रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी बुलढाणा व वाशीम एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या सहकाऱ्यांसह आचार संहितेच्या काळात रंगेहाथ अटक केल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणांतील फिर्यादी यांचा वाळु वाहतुकीचा व्यवसाय असुन वाळुचा लिलाव झालेला असल्यास ते कायदेशीर परवाना घेवुन वाळु वाहतुक करतात. परंतु सध्या वाळु वाहतुकीचा लिलाव झालेला नुसन अवैधरित्या वाळु वाहतुक सुरु आहे. तकारदार यांना ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळु वाहतुक सुरु करण्यासाठी यातील आरोपी क्र.२ मंगेश कुलथे याचेकडुन आरोपी लोकसेवक सचिन जायस्वाल तहसीलदार सिंदखेडराजा याचेकरीता एका ट्रॅक्टरसाठी प्रतिमहीना ३५००० रुपये लाचेची मागणी होत असल्याची तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा यांच्या कार्यालयात प्राप्त झाली होती.
त्यानुसार शुक्रवार दि. १२.०४.२०२४ रोजी लाच मागणीबाबत पडताळणी कार्यवाही करण्यात आली असता, लोकसेवक क्र.२ मंगेश शालीग्राम कुलथे,पद चालक,नेमणुक तहसील कार्यालय, सिंदखेडराजा याने तक्रारदार यांचेकडे आलोसे क्र.०१ सचिन जैस्वाल, तहसिलदार, सिंदखेडराजा याचेकरिता ३५,००० रुपये लाच मागणी करुन सदर लाच देण्यासाठी यातील आरोपी क्र.३ पंजाबराव तेजराव ताठे पद-शिपाई नेमणुक तहसील कार्यालय, सिंदखेडराजा याने प्रोत्साहन देवुन आरोपी आलोसे क्र.१ सचिन शंकरलाल जायस्वाल, तहसिलदार,सिंदखेडराजा याने सदर लाच रक्कम स्वीकारण्यास संमती देवुन सदर लाच रक्कम मंगेश कुलथे याचेकडे देण्यास सांगीतले. त्यावरून मंगेश कुलथे याने तक्रारदार यांना लाच रक्कम घेवुन बोलावल्याने दि. १२.०४.२०२४ रोजी सापळा कारवाई आयोजीत केली असता मंगेश कुलथे यास तकारदार यांचेकडुन ३५,००० रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहे .
वरील तिनही आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन सिंदखेडराजा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे. सापळा कार्यवाही नंतर सचिन जैस्वाल, तहसिलदार यास ताब्यात घेवून त्यांची राहते शासकीय निवासस्थानाची पंचासमक्ष घरझडती घेतली असता घरझडती दरम्यान सचिन जैस्वाल, तहसिलदार याच्या निवासस्थानामध्ये एकूण ३७,५२,१८०रुपये (अक्षरी – सदोतीस लाख बावन्न हजार एकशे ऐंशी) रूपये रोख रक्कम मिळून आले आहे तसेच त्याच्या परभणी येथील राहते घराची परभणी, एसीबीच्या पथकाने घरझडती घेतली असता सदर घरामध्ये ९,४०,०००रुपये (अक्षरी नऊ लाख चाळीस हजार) रूपये रोख रक्कम मिळून आले आहे. सदर रक्कमा जप्त करण्यात आल्या असून त्याच्याकडील इतर मालमत्तांचा शोध सुरू आहे.
सदर कार्यवाही शितल घोगरे,पोलीस उपअधिक्षक, एसीबी,बुलढाणा व गजानन शेळके,पोलीस उपअधिक्षक, एसीबी,वाशिम यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन इंगळे,पोलीस निरीक्षक,महेश भोसले,एएसआय,शाम भांगे, पोहेकों, प्रविण बैरागी,पोना.विनोद लोखंडे, जगदीश पवार,पोकॉ. रंजित व्यवहारे, मपोकॉ.स्वाती वाणी, चानापोकॉ. नितीन शेटे,मधुकर रगड यांनी पार पाडली.