सौदड येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

0
2

सडक अर्जुनी-सामाजिक शैक्षणिक क्रांतीचे अग्रदूत थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिल रोजी ग्राम सौंदड येथील माळी बहुजन समाज सभागृह येथे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

सर्व प्रथम क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला सेवानिवृत्त समाजशील शिक्षक अनिल मेश्राम यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला माजी सरपंच गायत्रीताई एकनाथ ईरले यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
महात्मा फुले जयंतीनिमित्त फुले दांपत्यांना अभिवादन प्रसंगी बहुसंख्येने समाजबांधव आणि गावकरी मान्यवर उपस्थित होते.
सडक अर्जुनी. सौन्दड येथे कार्यक्रमाला समाजबांधव उपस्थित होते.