राष्ट्रीय उद्यानात वन कर्मचाऱ्याची हत्या की आत्महत्या?

0
4

अर्जुनी/मोर :-  तालुक्यातील नवेगाव/बांध, पोलीस स्टेशन अंतर्गत, येथिल राष्ट्रीय उद्यानातील स्वागत कक्षात वनमजुर असलेले सुदाम राखडुजी किरसान 17 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास हिलटॉप गार्डनच्या परिसरातील पाण्याच्या टाकीवर इलेक्ट्रिक सर्विस (Electric Service) वायरनी गळफास अवस्थेत आढळले.

या घटनेची माहिती तेथिल वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद पझारे यांनी पोलीसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी (Autopsy) नवेगाव/बांध ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. शवविच्छेदन झाल्यानंतर घरच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले. वृत्तअसे की मृतकाच्या पत्नी आणि मुला-मुलीने नवेगाव/बांध उद्यानातील चौपाटीवर दि.5 मार्च 2024 ला घडलेल्या एका पुरुष व महिलांच्या अश्लील चाळे व्हिडीओ व्हायरल घटनेची माहिती आणि त्यांच्या मृतक वडिलांना 4 जणांनी दिलेली धमकी आणि आत्महत्या (suicide) करण्यास प्रवृत्त करने याबाबद मृतांच्या नातेवाईकांनी नावा सहित नवेगाव/बांध पोलीसांना माहिती दिली. परंतु घटनेला 15 दिवस लोटुनही नवेगाव/बांध पोलीसांनी अद्यापही आरोपी शोधुन काढले नाहीत.

पोलीसांची भुमिका संशयास्पद; कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही

यामुळे नवेगाव/बांध पोलीसांची भुमिका संशयास्पद असुन अजुन पर्यंत कोणतीही कार्रवाई किंवा गुन्हा दाखल(Filed a case)  करण्यात आलेला नाही. नवेगाव/बांध व परिसरातील जन माणसांत नवेगाव/बांध पोलीस सदर प्रकरण दडपत असल्याच्या खमंग चर्चा सुरु आहेत. वरिष्ठांनी या प्रकरणाकडे जातीने लक्ष देऊन दोषींवर कडक कार्रवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.