‘समृद्धी’वर चालकाला डुलकी आली अन दोघांचा गेला जीव

0
21

बुलढाणा: समृद्धी महामार्गावर आज सोमवारी झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन प्रवासी ठार तर चौघे गंभीर जखमी झाले.नागपूर कॉरिडॉर वर चॅनेल क्रमांक ३२८.८ येथे हा दुर्देवी अपघात झाला. एमजी हेक्टर (एम एच १२ आर एक्स ००७०) च्या चालकाला डुलकी लागल्याने भरधाव कार अनियंत्रित झाली. यामुळे चारचाकी वाहन ‘साईड बेरिअर’ला धडकली. अपघातात कार मधील २ प्रवासी ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतदेह सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालय येथे ठेवण्यात आले आहे.

दुसऱ्या एका घटनेत काल रविवारी( दि ५) नागपूर कॉरिडॉरवर झालेल्या अपघातात ५ जण जखमी झाले. ईनोवा कार (एम एच १२ केएन ४४४६) चा चालक साजिद शेख (वय ३२ ,पुणे ) हा पुण्यावरून नागपूर कडे जात होता. दरम्यान चालकाला डुलकी लागल्याने त्याने समोरील मालवाहू वाहनाला पाठीमागून धडक दिली. यामध्ये चालक साजिद शेख, बुरखान, नाईमुनिया, जयेश मोहंमद आणि फैयाज खान हे जखमी झाले. हे सर्व पुणे येथील राहिवासी आहेत. जखमींवर सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.