नागपूर : मागील वर्षी नीट च्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे यावर्षी देखील परीक्षेची पूर्वतयारी करत असलेल्या बुटीबोरी येथील म्हाडा कॉलोनी मधील एका सभ्य कुटुंबातील 19 वर्षीय मुलीचा बुटीबोरी येथील मुख्य चौकातील उडान पुलावरून खाली कोसळून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना दि. 4 मे रोजीच्या मध्यरात्री 1.30 ते 2 वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सदर घटनेबाबत ही हत्या की आत्महत्या अशा चर्चेवरून तर्क वितर्क करण्यात येत आहे. (NEET student) नीलिमा अखिलेश साहू (19) राहणार म्हाडा कॉलोनी, प्रभाग क्र.7 नवीन वसाहत बुटीबोरी ता.जिल्हा नागपूर असे घटनेतील मृतक विद्यार्थ्यानीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, नीलिमा ही कुटुंबातील धाकटी मुलगी तर तिची थोरली बहीण अंकिता ही आर्किटेक मध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. नुकतेच तिचे लग्न जुळले असल्याची माहिती आहे. निलिमाचे वडील अखिलेश साहू हे बुटीबोरी येथील एका खासगी कंपनी मध्ये नोकरीला आहे. आई गृहिणी आहे. मागील वर्षी नीलिमाने नीट ची परीक्षा दिली होती. मात्र कमी गुण मिळाल्यामुळे ती या वर्षी देखील परीक्षेत पुन्हा प्रयत्न करण्यासाठी अभ्यासाची पूर्व तयारी करीत होती दि 5 मे रोजी तिची परीक्षा होती. त्यामुळे आदल्यादिवशी तिने आपल्या सर्व कुटुंबियांसह नेहमीप्रमाणे एकत्र जेवण केले आणि ती स्वतःच्या खोलीत अभ्यास करण्याकरिता गेली.
त्यानंतर कुटुंबातील सर्व जण आपल्या आपल्या खोलीत आराम करण्यास निघून गेले. घटनादिनी घटनावेळी बुटीबोरी मुख्य चौकातील उडान पुलावरून कुणी एक अनोळखी मुलगी खाली कोसळल्याची माहिती अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातील पोलिसांना मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेत तिला तात्काळ उपचारार्थ स्थानिक माया रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. मृतक मुलीची ओळख पटवून पोलिसांनी ही माहिती तिच्या कुटुंबाला दिली. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.त्यांनी तात्काळ रुग्णालयात गाठून ही आमची नीलिमा असल्याचे सांगितले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणी करिता रवाना करण्यात आला. घटनेची नोंद करून पुढील तपास बुटीबोरी पोलीस करीत आहेत.
हत्या की आत्महत्या..? जनतेत चर्चा
नीलिमा (NEET student) ही एक अभ्यासू तसीच साधी सरळ आणि समजदार मुलगी असल्याचे सांगण्यात येत आहे. जर तिला अभ्यासाविषयी कोणता मानसिक तणाव होता तर त्याबद्दल तिने आपल्या आई बाबाला न सांगता आत्महत्येचा पर्याय का निवडला असावा..? ही घटना जरी दुर्दैवी असली तरी जर तिला आत्महत्याच करायचीच होती तर तिच्या राहत्या घरी तिची स्वतंत्र असी खोली होती मग तिने इतक्या मध्यरात्री आपले जीवन संपविण्यासाठी उडान पुलच का म्हणून निवडले..?संशयाची बाब असी की जेव्हा (NEET student) नीलिमाचा मृतदेह पुलाखाली पडून होता. तेव्हा तो पालथा होता तसेच तिच्या डोक्याच्या मागच्या भागाला मार लागल्याची जखम होती आणि पायाला खरचटल्याच्या जखमा होत्या तर तिची चप्पल ही पुलावरच होती. सदर घटनेबाबत ही हत्या की आत्महत्या यावरून परिसरात तर्क वितर्क करण्यात येत असून, यातील नेमके गूढ काय..? हे (Nagpur Police) तपासाअंतीच कळू शकेल.