प्राचार्याने मुलीची छेड काढली; तरूणांनी धो..धो…धुतले

0
10

साकोली : बागेत खेळत असलेल्या एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिची छेड काढणाऱ्या एका प्राचार्याला तेथे उपस्थित तरुणांनी चांगलाच चोप दिला. एवढेच नाही तर त्यानंतर झालेल्या पोलीस कारवाईमुळे या प्राचार्याला त्याची नोकरी ही गमवावी लागली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.प्राप्त माहितीनुसार, साकोली येथील एका फार्मसी कॉलेजमध्ये प्राचार्य पदावर कार्यरत असलेला डॉ. पी. एस .रघु हा दक्षिण भारतीय असून येथील पंचशील वार्डात भाड्याने राहतो. राष्ट्रीय महामार्गाला लागून स्टे ईन हाँटेलच्या समोर असलेल्या बागेत खेळण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला जवळ बोलवून तिच्याशी अश्लील चाळे करीत, नको त्या ठिकाणी स्पर्श करणे सुरू केले. त्यामुळे मुलगी घाबरली व रडत घरी जाऊन तिने आईला झालेला प्रकार सांगितला. तोपर्यंत बागेत फिरायला आलेल्या तरुणांनाही हा प्रकार माहित झाला.

चिडलेल्या तरुणांनी या प्राचार्याला घराबाहेर काढून त्याचे कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली आणि पोलिसांना बोलावून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी रघु याला ताब्यात घेऊन त्याच्यावर विविध कलमान्वये पोक्सो अंतर्गत कारवाई केलेली आहे. प्राचार्याच्या गैरवर्तनाला पाहून कॉलेज व्यवस्थापनाने रात्रीच या प्राचार्याचा राजीनामा घेऊन त्याला नोकरीतून बडतर्फ केले आहे. उच्चशिक्षित आरोपी प्राचार्य पदावर काम करत होता. तो दक्षिण भारतीय असून तो लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी बोलताना इंग्रजीचा वापर करत असे. या प्रकरणाचा तपास साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमित्रा साखरकर या करीत आहेत.