शेलोडी गावाजवळ दुचाकी व चारचाकीचा भीषण अपघात; एक ठार

0
10

यवतमाळ,दि.१३- दारव्हा शहरापासुन पाच कि.मि.अंतरावर असलेल्या यवतमाळ रस्त्यावरील शेलोडी (shelodi) गावाजवळ विना नंबरचे चारचाकी वाहन व दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला असुन दोन महीला गंभीर जखमी आहे.

हा अपघात सोमवार दि.१३ मे रोजी दुपारी २.०० वाजता दरम्यान झाला असुन जखमी महिलांना प्राथमिक उपचारासाठी दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात (sub district hospital) दाखल करण्यात आले होते. यवतमाळ रस्त्यावरील शेलोडी गावाजवळ विना नंबरचा कॅम्पर मालवाहु चारचाकी वाहन व दुचाकी स्पेल्डंर वाहन क्र.एमएच ३७ एसी ६९४९ची समोरासमोर धडक होवून यामध्ये यामध्ये दुचाकी चालक युवराज उत्तम आडे (३०) रा.उमरा ता.मानोरा जि.वाशिम (Washim)यांचा जागीच मृत्यु झाला तर दुचाकीवरील दोन महीला या गंभीर जखमी (seriously injured) असुन त्यांना उपस्थित नागरीकांनी प्राथमिक उपचारासाठी दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात (Upazila Hospital) दाखल केले आहे. विना नंबरचे कॅम्पर मालवाहु चारचाकी वाहन हे दारव्हाकडे येत होते तर दुचाकी धारक हे यवतमाळकडे जात होते.अपघातानंतर घटनास्थळावर बघ्यांनी गर्दी केली होती.