गुरूच्या नात्याला कलंक, कुस्ती क्लासच्या कोचं’नं केला अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग

0
8

#’कुस्ती कोच’वर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक

अकोला : पालकांना आवाहन आणि सतर्कता बाळगणेबाबत. कारण तुम्ही तुमच्या पाल्यांना खासगी क्लासेलला पाठवत असाल तर ही बातमी नक्की वाचाल. अकोल्यात एका खाजगी कुस्तीच्या केंद्रातल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली. येथील कुस्ती कोच’नेचं (वस्तात) आपल्याकड़ं कुस्ती शिकण्यासाठी आलेल्या 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केलाय. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी बालसंरक्षणा कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. तसेच घटनेचे गांभीर्य पाहता तात्काळ अकोला पोलिसांनी कुस्ती कोचला गजाआड केलंय. विशेष म्हणजे ही अल्पवयीन विद्यार्थिनी अजूनही या धक्क्यातून सावरली नाही.

पीड़ित मुलगी 9 मे पासून बेपत्ता होती, तिचा शोध लागल्यानंतर महिला व बाल कल्याण समिती आणि पोलिस अधिकाऱ्यांनी तिचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर जिथे ‘ती’ कुस्तीचं प्रशिक्षण घेण्यासाठी जात होती, तिथल्या कुस्ती ‘कोच’ जयशंकर धुर्वे यांनी गैरकृत्य केल्याचं सांगितले. राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्याने जात असताना तिला बळजबरी सोबत न्यायचाही प्रयत्न केला. असाही आरोप मुलीने केला आहे. पोलिसांनी लागलीच यासंदर्भात कुस्ती कोचला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध अपहरणाच्या संशयावरुनं आणि विनयभंग केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. मुलीबाबत माहिती असतानाही कोचनं माहिती लपवली होती. पीडित मुलीवर किती दिवसांपासून गैरवर्तन सुरू होतं. याचाही तपास केल्या जाणार. दरम्यान पीडित मुलगी नेमकं कोणाच्या दबावाखाली घरून निघाली होती?, कुस्ती क्लासेस च्या नावाखाली आणखी कोणासोबत गैरवर्तन झालं का? याचाही तपास पोलिस करतायत. या प्रकरणानंतर पालकांनी खबरदारी घेण्याचा आवाहनही पोलीस निरीक्षक निलेश लेव्हंकर यांनी केले.

नेमकं 9 मे’रोजी काय घडलं होतंय?

जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश लेव्हंकर यांनी दिलेल्या माहितीनूसार, वसाहत भागात वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातली 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी रागाच्या भरात घरूनं निघाली. बराच वेळ होऊनही ‘ती’ घरी परतली नाही. कुटुंबीयांकडून तिचा शोध घेण्यात आला, पण तिचा सुगावा लागला नाहीये. अखेर 9 मे’ रोजी कुटुबियांनी पोलीस स्टेशन गाठलं, अन् मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिस तिच्या शोधार्थ लागले. मुलीच्या मैत्रिणी व इतर नातेवाईकांकडून माहिती मिळाली की पीडित मुली बाबत कुस्तीचा कोच जयशंकर धूर्वे (वय 54) यांना माहिती आहे. पोलिस त्यांच्यापर्यत पोचले. आणि तिच्याबद्दल ‘धुर्वे’ यांना विचारणा केली. त्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे देत आपल्या यासंदर्भात काहीच माहिती नसल्याचे सांगितले. मात्र सखोल चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. विशेष म्हणजे मुलगी बेपत्ता असल्यापासून शहरातल्या बालगृहात राहायला गेली होती.

या अगोदरही अकोल्यात गुरूच्या नात्याला लागला कलंक-

एका टेबल टेनिस प्रशिक्षकाविरुद्ध सिव्हिल लाइन्स पाेलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा करण्यात आला होता. चक्क प्रशिक्षकानेच टेबल टेनिस शिकण्यासाठी आलेल्या मुलीचा विनयभंग केला होता. तसेच एका नामांकित कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणी वर्गासाठी आलेल्या विद्यार्थिनीचा येथील शिक्षकाने विनयभंग केला होता. यापूर्वीही काही ठिकाणच्या काेचविराेधात विविध पाेलिस ठाण्यांमध्ये अत्याचाराचे गुन्हे दाखल झालेत. पोलिसांकडून तपास करण्यात येत असून, कारवाईदेखील सुरु आहे. मात्र तरीही काही काेचकडून अत्याचार थांबत नसल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे.