सोनेचांदीचे दागीणे लंपास करणारी टोळीला जेरबंद

0
6

गोंदिया,दि.२३ः– शहरातील मुख्य बसस्थानक व इतर ठिकाणाहून सोनेचांदीचे दागीणे लंपास करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात रामनगर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.संशयित महिला सिमरण आशिष बिसेन (24), विधीसंघर्ष बालिका (15), सुरज पप्पु बिसेन (20), आशिष पप्पु बिसेन (28) सर्व रा. कुडवा/गोंदिया अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून 20 लाख 9 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्याच्या कलपाथरी येथील अरुणा गौरव येडे या 18 मे रोजी संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास मुख्य बस स्थानकावर मुलासह गोंदिया-भंडारा बसमध्ये चढत असताना त्यांच्या पर्समधील सोनेचांदीचे दागीणे व रोख 25,000 असा 2 लाख 43 हजारचा मुद्देमाल चोरी झाल्याची तक्रार पोलिसात दिली. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठून परीसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यात दोन संशयास्पद महिला अरुणा यांच्या मागावर असल्याचे दिसले. अरुणा ज्या बसमध्ये चढत होत्या तेथील गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पर्शमशील सामान चोरी करून पळून जातांना दिसून आल्या. गोपनीय बातमीदाराद्वारे संशयीत महिलांची माहिती करून 21 मे रोजी सिमरण व विधीसंघर्ष बालिकेला ताब्यात घेतले. दोघींचीही चौकशी केली असता बसस्थानक व इतरही ठिकाणी चोरी केल्याची कबूली त्यांनी दिली. घरझडतीमध्ये अरुणा यांचा 2 लाख 28 हजार रुपयांचा व इतर ठिकाणहून चोरी केलेला 17 लाख 81 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला. महिन्याभरापूर्वी सालेकसा बसस्थानकातून एका महिलेच्या पर्समधून चोरल्याचे तसेच उर्वरीत मुद्देमाल आरोपी सुरज व आशिष यांनी गोंदिया शहर व परीसरातून चोरी केल्याचे सांगितले. असा 20 लाख 9 हजार 400 रुपयाचा मुद्देमाल पोलिसानी हस्तगत केला आहे. चौघांनाही रामनगर पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले.