पुन्हा समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला धडक; एक ठार, एक गंभीर

0
5

कारंजा :- समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला दुसऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. २९ मे रोजी सकाळी ६.२० वाजता घडलेल्या भीषण अपघातात एक जण घटनास्थळीच ठार(Death) झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे.प्राप्त माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील ग्राम पोहा हद्दीत एमएच १६ बीसी ८१७४ क्रमांकाचा एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. यादरम्यान मागील बाजूने भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या ट्रकने (एमएच १५ जी ९५१३) उभ्या ट्रकला जोरदार धडक (hit hard)दिली. ही धडक एवढी भीषण होती की दोन्ही चालक ट्रकमध्ये अडकून पडले होते. दरम्यान, या घटनेत योगेश निवृत्ती खैनार (३९, रा. लासलगाव ता. निफाड जि. नाशिक) हा घटनास्थळी ठार झाला तर प्रदीपसिंग जसवंतसिंग मान (३५) हा गंभीररित्या जखमी (wounded) झाला. घटनेची माहिती मिळताच १०८ लोकेशन कारंजा समृद्धी महामार्ग पायलट आतिश चव्हाण, डॉ.मोबसिर व श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख, महाराष्ट्र सुरक्षा बल अग्निशामक दल लोकेशन समृद्धी महामार्ग, हायवे पोलीस टीम व कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले होते. त्यांनी ट्रकमध्ये अडकलेल्या चालकांना बाहेर जेसीबी मशीनच्या (JCB Machine) मदतीने बाहेर काढले व वाहतूक सुरळीत केली.