वाशिम जिल्हा उप निबंधक दिग्विजय राठोड एसीबीच्या ताब्यात

0
215

 वाशिम,दि.०७ः येथील  जिल्हा उप निबंधकाला थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ९ लाख रुपयांची लाच मागून त्यातील दुसरा हफ्ता ६ लाख रुपयांची लाच स्वीकारत असताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडुन अकोला  एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

 दिग्विजय हेमनाथ राठोड, वय ५४ वर्ष, पद जिल्हा उपनिबंधक,वर्ग -१ सहकारी संस्था वाशिम,कायम पत्ता ,साई विहार रेसिडेन्सी,पाषाण सुस रोड,पुणे २१ ह.मु.सिल्वर अपार्टमेंट, तिरुपती सिटी,फ्लॅट नंबर ५०६ वाशिम असे ह्या अटक केलेल्या जिल्हा उप निबंधकाचे नाव आहे.

यातील तक्रारदार यांचे विरूध्द सुरू असलेल्या प्राथमिक चौकशीचा अहवाल तक्रारदार यांची बाजूने अनुकूल पाठवण्यासाठी  दिग्विजय राठोड,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशिम,यांनी ९,००,००० रुपये लाचेची मागणी करून यापूर्वी तक्रारदार यांचे कडून २,५०,००० रुपये स्वीकारले आहेत.उर्वरित ६,५०,००० रुपयांच्या  लाचेसाठी तक्रारदार यांना तकादा लावून मागणी करत असल्याबाबत तक्रारदार यांनी दि. ४/६/२०२४ रोजी अँटी करप्शन ब्युरो अकोला येथे तक्रार दिल्याने  नमूद तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक ६/६/२०२४ रोजी पडताळणी कारवाई केली असता आरोपी राठोड यांनी तडजोडीअंती तक्रारदारास ६,००,००० रुपये लाच रक्कम मागितल्याचे निष्पन्न झाले.त्यावरून आज सायंकाळी सापळा कारवाई आयोजित केली  असता तक्रारदार यांनी लाच रक्कम ६,००,००० रुपये स्वीकारल्याने त्यांस ताब्यात  घेऊन भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम  १९८८ अन्वये वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.कारवाई सचिन सावंत,पोलीस निरीक्षक लाप्रवि अकोला यांचे नेतृत्वातील  कारवाई पथकातील पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार, पोलिस अंमलदार दिगंबर जाधव, अभय बावस्कर, संदीप ताले, निलेश शेगोकार एसीबी अकोला यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.