२ लाखाचा बक्षीस असलेला माओवाद्याचे गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण

0
23

गडचिरोली,दि.१०ः-माओवाद्याच्या ११ प्रकरणात सहभागी व २ लाख रुपयाचा बक्षिस असलेल्या एका जहाल आज10 जून 2024 रोजी गडचिरोली पोलीस व सीआरपीएफसमोर आत्मसमर्पण केले.त्या माओवाद्याचे नाव किशोर ऊर्फ मुकेश पेन्टा कन्नाके वय 37 वर्ष रा. नेलगुंडा, तह. भामरागड, जि. गडचिरोली असे आहे.शासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे आजपर्यंत एकुण 663 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.

किशोर ऊर्फ मुकेश पेन्टा कन्नाके  हा 2014 मध्ये जनमिलिशिया सदस्य म्हणून (भामरागड दलम) मध्ये भरती होवून सन 2015 पर्यंत कार्यरत होता.2015 मध्ये डीएकेएमएस (दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना) मध्ये अध्यक्ष पदावर पदोन्नती होवून सन 2018 पर्यंत कार्यरत होता.२018 मध्ये आरपीसी (रक्षा पार्टी कमिटी/रिवॉल्युशनरी पिपल काउंसिल) सदस्य म्हणून सन 2022 पर्यंत कार्यरत होता.त्यानंतर 2022 पासून भामरागड दलम सदस्य व आरपीसी (रक्षा पार्टी कमिटी/रिवॉल्युशनरी पिपल काउंसिल) चा अध्यक्ष पदावर पदोन्नती होवून आजपावेतो कार्यरत होता. त्याच्यावर दरबा पहाडी,कोपर्शी जंगल व पेेनगुंडा जंगलीतील चकमकीत प्रत्यक्ष सहभागाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.सोबतच ४ खून केल्याचे व ४ जाळपोळीच्या घटनांची नोंद त्याच्या नावे आहे.महाराष्ट्र शासनाने किशोर ऊर्फ मुकेश पेन्टा कन्नाके याचेवर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन किशोर ऊर्फ मुकेश पेन्टा कन्नाके याला एकुण 4 लाख 50 हजार रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 15 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्रअंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ जगदीश मीणा, पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, कमांण्डट 37 बटा. सिआरपीएफ एम.एच.खोब्राागडे, पोलीस अधीक्षक विशेष कृती दल नागपूर संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, नक्षलविरोधी अभियान नागपूर श्रीमती. ज्योत्स्ना मसराम, सपोनि. जितेंद्र वैरागडे, पोहवा/प्रमोद पुरी सह सीआरपीएफ 37 बटा. बी-कंपणीने पार पाडली.