बोंडगावदेवी जवळील घटना
अर्जुनी मोर. – चारचाकी वाहनाने पायी चालणा-या इसमास धडक दिल्याने एक इसम जागीच ठार झाल्याची घटना सानगडी-अर्जुनी मोर.मार्गावर बोंडगावदेवी येथील रोपवाटीकेजवळ ता.23 जुन रोजी रात्रौ 9 वाजेच्या दरम्यान घडली.यामधे अशोक शामराव कोल्हारे वय 35 रा.बुधेवाडा असे मृतकाचे नाव आहे. तर त्याचा नातेवाईक खुशाल तुळशीराम देवरे रा.बोंडगावदेवी हा सुदैवाने बचावला.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक अशोक कोल्हारे रा.बुधेवाडा हा आपला नातेवाईक खुशाल तुळशीराम देवरे रा बोंडगावदेवी यांचे सोबत पायी पायी बोंडगावदेवी येथे जात होते. अशातच चारचाकी वाहन क्र.एम.एच.35 एजी 1667 चे चालक जयेश साधुजी भोवते यांनी त्यांचे ताब्यातील वाहन भरधाव व बेजबाबदार पणे चालवुन जबर धडक दिल्याने अशोक कोल्हारे यांचा जागीच मृत्यू झाला. फिर्यादी पतीराम शंकर देवरे यांचे तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी तागड यांचे मार्गदर्नाखाली बिट अंमलदार इंद्रपाल कोडापे करीत आहेत.