मुंडीपार येथे जुगार अड्यावर धाड, 10 जणांना अटक

0
824

गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार परिसरात 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता जुगार अड्ड्यावर धाड टाकून 10 जणांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या अंगझडतीतून 19 हजार 500 रुपये रोख, 8 नग मोबाइल किंमत 59 हजार 150 रुपये, तीन मोटारसायकल किंमत 1 लाख 90 हजार रुपये व तासपत्ते असा एकूण 2 लाख 69 हजार 310 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली. पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांनी जिल्ह्यांतील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर प्रभावी धाड घालून दर्जेदार कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध प्रभावी धाड मोहीम राबवून कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणात प्रवीणकुमार मथाराम पटले (वय 34, रा. मुंडीपार), सुजय सुशील मजुमदार (वय 45, रा. मुंडीपार), डिलनसिंग त्रिलोचनसिंग समन्से (वय 36, रा. घुमर्रा, ता. गोरेगाव), विकास आनंदराव चव्हाण (वय 35, रा. भडंगा, ता. गोरेगाव), उमेश गोंविदराव राऊत (वय 33, रा. मुंडीपार, ता. गोरेगाव), संतोष सुकलाल टेंभेकर (वय 43, रा. मुंडीपार), अमित रामदास डोये (वय 41, रा. पालेवाडा), संतोष ताराचंद चौधरी (वय 23, रा. मुंडीपार), देवानंद अनंतराम वाकले (वय 36, रा. घुमर्रा), कमलेश विनोद डहारे (वय 28, रा. पालेवाडा) यांच्या विरुद्ध गोरेगाव पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, पोलिस उपनिरीक्षक शरद सैदाने, पोलिस हवालदार विठ्ठल ठाकरे, तुलसी लुटे, पोलिस शिपाई संतोष केदार, अजय रहांगडाले, हंसराज भांडारकर, दुर्गेश पाटील, चालक घनश्याम कुंभलवार यांनी केली.